प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, खा. जयसिद्धेश्वर महास्वामींची पोलिसात तक्रार

सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे.

प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. जात वैधता पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसात तक्रार. 9 तारखेला प्रवासादरम्यान दाखला हरवला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

Loading...

दरम्यान, 14 तारखेला पोलिसात खासदारांच्या नावाने तक्रार अर्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारीला या जात प्रमाणपत्र बाबत अंतिम सुनावणी पार पडली. त्यावेळी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती खासदारांच्या वकिलांनी दिली होती.

अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासदारांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच आता जातीचा दाखला हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....