पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेलेल्या तरुणाचे पैसे हिसकावून केले कारचे नुकसान

aurangabad

औरंंगाबाद : पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेलेल्या तरुणाच्या गाडीची काच फोडून त्याच्या खिशातील सात हजाराची रोकड दोघांनी हिसकावले. ही घटना सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पुंडलिकनगर रस्त्यावरील इस्सार पेट्रोल पंपावर घडली. वसंत बाबू चव्हाण (वय २३, रा. विशालनगर, गारखेडा परिसर) हा मित्रासोबत गाडीत पेट्रोल भरण्यासाठी इस्सार पेट्रोल पंपावर गेला होता.

त्यावेळी तेथे आलेल्या विनोद मारुती गायकवाड (रा. हनुमाननगर) याने वसंतकडे पैशांची मागणी केली. परंतू त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने विनोदसह त्याच्या साथीदाराने वसंतच्या गाडीची काच फोडून त्याच्या खिशातील सात हजाराची रोकड लांबवली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विनोद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुंडलिकनगर ठाण्यात त्याच्यावर सुमारे सात गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी याधीही त्याला अशा गुन्ह्यांसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याचे आणखीन साथीदार सामील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP