मुंबई : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली स्टेशन जवळील एस. के. पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे हे आपले कर्तव्य बजावत असतानाच एका कारचालकाने त्यांना चक्क फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या गाडीला काळ्या काचा लावल्या होत्या तसेच गाडीत मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने गाडी ना थांबवता होरे याना धडक देत गाडी त्यांच्या अंगावर नेली. या दरम्यान होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवनपर्यंत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने तेथून पळ काढला.
ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यात हवालदार होरे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. या घटनेची तात्काळ दाखल घेत चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही”; राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Clyde Crasto : “क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- Mohan Bhagwat | फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरे देखील करतात – मोहन भागवत
- Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स
- Sanjay Raut : राज्यात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<