‘फोन करणारे माझ्याकडे विचित्र मागण्या करत होते’; पूनमने राज कुंद्राविरोधात केली तक्रार दाखल

पूनम पांडे

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता याप्रकरणाबाबत अभिनेत्री पूनम पांडेने  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीशी संबंधित लोकांवर फौजदारी खटला दाखल करण्याची विनंती देखील पूनमने केली आहे. पूनम पांडे याविषयी म्हणाली,’मला धमकी देत माझ्याकडून जबरदस्तीने कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेण्यात आली. मी या करारावर सही करण्यास इच्छूक नव्हते. मला करार रद्द करायचा होता. तेव्हा त्यांनी माझा मोबाईल नंबर लीक केला. ज्यात ‘मला आता फोन करा. मी तुमच्यासाठी माझे कपडे उतरवेन.’ असं म्हंटलं होतं. त्यानंतर मला हजारो फोन आले आणि फोन करणारे माझ्याकडे विचित्र मागण्या करत होते. लोकांनी मला अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली.’ असं म्हणत तिने राज कुंद्र वर आरोप केले आहेत.

याआधी २०१९सालामध्ये देखील पूनम पांडेने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले होते. पूनमने राज कुंद्रा आणि त्याचा सहयोगी सौरभ कुशवाहा या दोघां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा आणि त्याची कंपनी बेकायदेशीररित्या तिच्या फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करत असल्याचा आरोप पूनमने केला होता.

दरम्यान सध्या राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP