fbpx

सरकार आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात ; आंदोलनासाठी येणाऱ्या बस, रेल्वे सरकारने रोखल्या

अण्णा हजारे, नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : सरकार आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या बस, रेल्वे सरकारने रोखल्या आहेत. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये असे होता कामा नये असा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर लावला आहे.

दरम्यान, अण्णा हजारे आजपासून एका नव्या आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णा आजपासून सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. आज २३ मार्च अर्थात शहीद दिनाचं औचित्य साधून अण्णा आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.

या आंदोलनासाठी देशभरातील कार्यकर्ते, शेतकरी रामलीला मैदानावर जमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकपालसह राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे हे आंदोलनास उतरले आहेत.