घरफोड्याची हर्सूल कारागृहात रवानगी

harsool jail

औरंंगाबाद : घराचे कुलूप तोडून घरातील टीव्हीसह, १० हजारांची रोख रक्कम व चांदीचा हार असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणारा सराईत चोराटा सय्यद हनिफ ऊर्फ बा सय्यद हबीब (वय २३, रा. शरीफ कॉलनी) याची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी दिले.

रेवन श्रावण सोनवणे (वय २३, रा. भवानी नगर, जुना मोंढा) याने फिर्याद दिली. त्यानूसार, १ ते ३ सप्टेंबर दरम्यान फिर्यादीची मावशी व मावस भाव हे घराला कुलूप लावून गावी गेले होते. गावावरून आल्यावर त्यांना हा प्रकार समजला.

दरम्यान, संधी साधत चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील २९ हजारांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी सय्यद हनिफ ऊर्फ बा याला ४ सप्टेंबर रोजी अटक केली होती.

महत्त्वाच्या बातम्या