पुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका

पुणे: मुंढवा येथील केशवनगर परिसरात असणारी जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. तर आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शोध कार्य सुरू आहे.

bagdure

केशवनगर परिसरात असणारी जुनी इमारत दुपारी एकच्या सुमारस अचानक कोसळली. यावेळी इमारतीमध्ये असणारे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले गेले. यामधील नऊ जणांची सुटका करण्यात आली आहे. तर इमारतीखाली असणाऱ्या गोट्यामधील ३ ते ४ जनावरे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...