न्यू इंडियाचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प,योगींची स्तुतिसुमने

टीम महाराष्ट्र देशा- नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडला. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत.नोकरदारांना मोदी सरकारने मोठ गिफ्ट दिलं असून ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कुठलाही टॅक्स नसणार आहे.५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पूर्ण कर सवलत देण्यात आली आहे.

सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सरकारने महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून आम्ही कमरतोड महागाईची कंबरच मोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.2020 पर्यंत प्रत्येकांना घर आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. न्यू इंडियाचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगत योगींनी अर्थसंकल्पावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

दरम्यान,निवडणुकांपूर्वी मध्यमवर्गाला, शेतकऱ्यांना, कामगारांना,महिलांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक घोषणांची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रामाणिक करदात्यांचे पियूष गोयल यांनी कौतुक केले खरे मात्र त्याला दिलासा देण्यासाठी सध्याच्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. सध्या 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असून ते बदलण्यात आलेले नाहीये. गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे.

प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे.