मुंबई : महाविकास आघाडी सरकार अधिवेशन घेण्यासाठी घाबरत आहे. अशी टीका गेले अनेक दिवस भाजप करत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं घ्यायचं या विवंचनेत राज्य सरकार होतं. त्यामुळेच साधारणतः महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस चालणार आहे. आज पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.कमी कालावधीसाठी अधिवेशन होत असल्याने विरोधक नाराज झाले आहेत. विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला आहे. तर ८ मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
कोरोनामुळे अधिवेशनात विशेष काळजीही घेतली जाणार आहे. आमदारांची सोशल डिस्टंसिंग राखत सभागृहात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच काही आमदारांची बसण्याची व्यवस्था प्रेक्षक आणि अधिकार गॅलरीत करण्यात येणार आहे. अधिवेशनापूर्वी मंत्री, आमदार, तसंच अधिवेशनासाठी येणार्या कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी अभ्यागत आणि आमदारांच्या पीएना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. अशी सर्व काळजी घेऊन राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकसंख्या वाढविणे हे मर्दानगीचे काम आहे,ज्याच्यामध्ये दम असेल ते वाढवू शकतात – अख्तरुल इमान
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला : निलेश राणे
- इंधन दरवाढीचा निषेध करत इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या ‘या’ महिला नेत्याला तुम्ही ओळखलं का ?
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत