fbpx

अर्थसंकल्पातील तरतूद म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा – डॉ. अजित नवले

टीम महारष्ट्र देशा : देशाच्या अर्थसंकल्पात यावर्षी तरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती पण तस न होता या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे.या अर्थसंकल्पातून शेतीला संकटातून सावरण्यासाठी ठोस आर्थिक धोरणे आखण्याची अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. याउलट पी.एम. किसान योजने अंतर्गत महिन्याला पाचशे रुपये जीवन जगण्यासाठी तुटपुंजी मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

डॉ. अजित नवले म्हणाले की , सिंचन व दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पात होईल असेही वाटत होते. तसेच कांदा, फळे व पालेभाज्या या सारख्या नाशवंत शेतीमालाला भावाच्या चढउतारापासून संरक्षण देण्यासाठी ठोस आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती. पण सरकारने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. मागे झालेल्या निवडणुकांचा फटका लक्षात घेवून तरी भाजप सरकार यावेळेस चंगले अर्थ संकल्प सादर करेल अशी अपेक्षा होती. मात्र, असे घडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत खेदाची बाब आहे, असा आरोप नवले यांनी केला.

या अर्थसंकल्पात पाच एक्करच्या आतील भूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने पी .एम किसान योजने अंतर्गत महिन्याला पाचशे रुपये जीवन जगण्यासाठी मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे.