आमच्याप्रमाणे विरोधकांनीही नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं, मुख्यमंत्र्यांनी उडवली विरोधकांची खिल्ली

given the status of freedom fighters

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधानसभेत सादर करण्यात आला. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. मात्र विरोधकांकडून सरकारनेच हा अर्थसंकल्प फोडल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, विरोधकांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली आहे. अर्थसंकल्पाचा पहिला भाग संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उभे राहत विरोधकांच्या आरोपावर सरकारच्यावतीने स्पष्टीकरणही दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?

अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्यातील महत्त्वाच्या तरतुदी ट्विटरवर पोस्ट करण्यात येत आहेत. अर्थमंत्र्यांचे भाषण आणि या पोस्टमध्ये दोन ते तीन मिनिटांचं अंतर राखण्यात आलं आहे. एकही पोस्ट आधी शेअर करण्यात आलेली नाही. आम्ही केवळ नव्या माध्यमाचा वापर करून वेगवान अपडेट्स जनतेला देत आहोत. त्यामुळे अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला हा विरोधकांचा आरोप निरर्थक आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असतानाही अशाप्रकारे ट्विटरच्या माध्यमाचा वापर करण्यात आला होता. आमच्याप्रमाणे विरोधकांनीही नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं.Loading…
Loading...