मायावतींना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचं स्वप्न पाहणं बसपा नेत्याला पडलं महागात

Mayawati resigns from Rajya Sabha

टीम महाराष्ट्र देशा – राहुल गांधी हे त्यांच्या आईसारखेच दिसतात. त्यांची आई परदेशी असल्यामुळे राहुल गांधी देखील पंतप्रधान होऊ शकत नाही बसपा नेते जयप्रकाश सिंह यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.  जयप्रकाश यांच्या विधानाने वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मायावतींनी जयप्रकाश यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे मायावतींना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचं स्वप्न पाहणं बसपा नेते सिंह यांना चांगलंच महागात पडलं.

बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असेल, यावर चर्चा सुरु होती. यावेळी  पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले.

नेमकं काय म्हणाले होते जयप्रकाश सिंह ?

राहुल गांधी हे त्यांच्या आईसारखेच दिसतात. त्यांची आई परदेशी असून यामुळे राहुल गांधी देखील पंतप्रधान होऊ शकत नाहीत. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या सरकार स्थापनेत मायावतींनी मोलाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय राजकारणात मायावतींनी छाप पाडली असून नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात. मायावतींचा तळागाळातील जनतेशी संपर्क असून त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीदेखील होत्या. त्यामुळे पंतप्रधानपदावर काम करण्याची क्षमता मायावतींमध्येच आहे.