‘मोदी नावाच्या बॉक्सरने प्रशिक्षक अडवाणी यांनाच मारले’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. अशातच २०१४ च्या निवडणुकीवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाना साधला आहे.

भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाचा बॉक्सर उतरवला होता. भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱयांचे प्रश्न यावर हा बॉक्सर प्रहार करेल अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र मैदानात उतरल्यावर सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याऐवजी प्रशिक्षक असणाऱ्या लालकृष्ण आडवाणी यांनाच मारले अशी टीका मोदी यांच्यावर केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली होती.Loading…
Loading...