भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी,इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट

बर्मिंगहॅम : आपल्या 1000व्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ दमदार कामगिरी करेल, असे क्रिकेट चाहत्यांना वाटले होते. पण गुरुवारी फक्त दोन धावांची भर घालून इंग्लंडचा संघ तंबूत परतला.भारतीय बॉलरच्या भेदर माऱ्यामुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट झाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८५/९ अशी करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त २ रनच करता आल्या. मोहम्मद शमीनं इंग्लंडची शेवटची विकेट घेतली.

या सामन्यात आर. अश्विनने चार आणि मोहम्मद शमीने तीन बळी मिळवले. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची 9 बाद 285 अशी स्थिती होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त दोन धावांमध्य इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. रूटला विराट कोहलीनं रन आऊट केलं. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.

इंग्लंडचा धुव्वा; ‘विराट’ विजयासह मालिकेत भारताची 3-0 ने आघाडी

दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लडचा भारतावर विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी