बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह आढळला; मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा

rape

घानपूर – तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. हा मृतदेह आढळून आल्यानंतर आता उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.

मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

हैदराबाद पोलिसांनी आरोपी राजू याला पकडण्यासाठी दहा लाख रुपयांचे इनाम लावले होते. असून विविध ठिकाणी पोलिसांच्या टीम त्याला अटक करण्यासाठी रवाना झाल्या होत्या. पण आता त्याचा मृतदेह लागवड घनपूर येथील रेल्वे ट्रॅक वर आढळला आहे.

संबंधित आरोपीला पकडून एन्काऊंटर करू, असे तेलंगणचे मंत्री चमकूला मल्ला एचडी रेड्डी यांनी म्हटले होते. आम्ही सरकार म्हणून बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे आहोत. त्यांना आम्ही मदत करू. पण लवकरात लवकर या कुणासोबत गुन्ह्यातील आरोपीला पकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात येईल, असे चमकुला रेड्डी यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या