पाण्यात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

बीड: परळीतून बुधवारी पाण्यात वाहून गेलेल्या दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी सापडले असून एका सटवाई मळा तर दुसरा मुलगा दाऊदपुर जवळ सापडला. काल बरकतनगर नजीक घनशी नदी जाते. या नदीपात्रात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खूप पाणी आलेले आहे.

या नदिवर बंधारा बांधलेला आहे. बंधार्या जवळ हीमुले पोहायला गेली होती. पाण्याचा अंदाज न घेताच फुले नगर येथील उमेश बबनराव चाहुरकर (वय 13) व सिध्दार्थ नगर भागातील राष्ट्रपाल बबन गायकवाड (वय 15) या दोघांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या होत्या तेथे असलेला बरकतनगर येथील शाहेद कुरेशी (वय 22) याने दोघा मुलांना वाढविण्यासाठी पाण्यात उडी टाकली होती मात्र तो काल पाण्यात बुडून मरण पावला आणि बुडालेल्या त्या दोन मुलांचे मृतदेह आज गुरूवारी सकाळी सापडले.

You might also like
Comments
Loading...