भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतले माणिक सरकारचे आशीर्वाद

त्रिपुरात दिसला राजकीय सुसंस्कृतपणा

आगरताळा, त्रिपुरा: तब्बल २० वर्षे त्रिपुराचं मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या माणिक सरकारला अखेर  भाजपने चीत केले. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेले माकप नेते माणिक सरकार त्यांच्या वयाचा आणि अनुभवाचा मान राखत, कट्टर विरोधक असलेल्या विप्लव देब यांनी कटुता बाजूला सारत आशिर्वाद घेतले.

त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील आघाडीचे विप्लव कुमार देब यांनी सुसंस्कृतपणा दाखवत माणिक सरकार यांचे आशीर्वाद घेतले. राजकारणात विरोधक नेहमीच आमने सामने असतात. तसेच एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका देखील केली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने माकपची तब्बल २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली. भाजपने ६० पैकी ३५, आयपीएफटी ८ आणि माकपला केवळ १६ जागा मिळाल्या. भाजप आणि आयपीएफटीची युती असल्याने त्यांच्या जागा तब्बल ४३ झाल्या. गेल्या निवडणुकीत १० जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा त्रिपुरात खातंही उघडता आलं नाही. त्रिपुरा हा डाव्यांचा गड मानला जातो. गेल्या निवडणुकीत भाजपला खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र यंदा भाजपने डाव्यांचा गड रोखत थेट सत्ता स्थापन केली आहे.

(विप्लव देब)

You might also like
Comments
Loading...