‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार सुरूच; नातेवाईकांच्या नाईलाजाचा फायदा घेवून सुरु आहे लुटमार

remdesvir

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसात अनेक शहरात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. पुणे जिल्ह्यात 77 हजार 808 सक्रीय रुग्ण आहेत. त्यामध्ये 18 हजार 563 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये पुणे शहरामध्ये 919 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या गंभीर रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता असते. परंतु या इंजेक्शनचा शहरामध्ये तुटवडा झाल्याने रुग्णांचे नातेवाईक पायांना अक्षरशः भिंगरी लावून विविध फार्मसी स्टोअरमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना प्रत्येक ठिकाणी निराशा हाती येत आहे.विविध माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांचा गैरफायदा घेणं सध्या अनेक ठिकाणी सुरु आहे, कोरोनावर रेमडेसिव्हीर या इंजेक्शनसाठी रुग्णालयाकडून वाढीव किंमती आकरण्यात येत आहेत. रुग्णांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नाईलाजाचा हा असा गैफायदा खासगी काहीजण घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

रेमडेसिवीर सारख्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत आणि ही औषधे कोरोना रुग्णांना कमीत कमी किमतीत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.

भांडारी म्हणाले की, कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध घालण्याबरोबरच यावरची औषधे , उपचार गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी आहे.राज्यात रेमडेसिवीर सारख्या औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या