रेमडेसिव्हिरचा काळाबाजार! घाटीतील कर्मचारी, मेडिकल चालकासह तिघे अटकेत

कोरोना वॅक्सीन

औरंगाबाद : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. हजारो लोक दररोज पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. अतिगंभीर रुग्णावर उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच गैरफायदा घेऊन काही भामट्यानी राज्यात अनेक भागात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला आहे.

औरंगाबादमध्येही रेमडेसिव्हिर इंजेक्शनची साठवणूक करून रुग्णांच्या नातेवाईकांना चढ्या दराने विक्री करणाऱ्या घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह मेडिकल मालक व अन्य एकाला पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मंदार अनंत भालेराव (रा . शिवाजीनगर, बारावी योजना गारखेडा परिसर, औरंगाबाद), इंदिरा मेडिकलचा मालक अभिजीत नामदेव तौर (रा. सहयोग नगर , गारखेडा परिसर) आणि घाटीतील कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते (रा. शिवाजीनगर अशी रेमडीसीव्हरचा काळाबाजार करणाऱ्यांची अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अशी माहिती पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी शुक्रवारी (दि. १५ एप्रिल ) दिली. या तिघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक राजगोपाल आर बजाज यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वापरलेली दुचाकी आणि मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या