मुंबई: महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. मात्र ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडून या निर्णयाला कडाडून विरोध केला जात असतानाच काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी आता भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
सचिन सावंत यांनी भाजपशासित मध्ये प्रदेश सरकारचा संदर्भ देत भाजपवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फक्त वाईन विकण्यासाठी परवानगी दिली जाते परंतु मध्य प्रदेशात सर्व मद्य सुपर मार्केटमध्ये विकले जाईल. मध्यप्रदेशातही आता घरगुती साठा वाढू शकतो. दारूच्या दुकानांना कंपोझिट शॉप असे संबोधले जाईल जेथे व्यापारी सर्व प्रकारची दारू विकू शकतील.(या संबंधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान(Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांचा व्हिडिओही सचिन सावंत यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये १ एप्रिल पासून मध्यप्रदेशात सर्व मद्य सुपर मार्केटमध्ये विकले जाणार असल्याचे म्हटले आहे.) थोड़ी थोड़ी नहीं अधिक पिया करो! विरोधात असताना दारूला विरोध करण्याची आणि सत्तेत असताना दारूला प्रोत्साहन देण्याची भाजपची रणनीती आहे का?” असा सवाल करत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
2. Also in MP now home stock also can be increased. Liquor shops will be called as Composite shops where traders can sell all types of liquor.
थोड़ी थोड़ी नहीं ज्यादा ज्यादा पिया करो!
Does BJP hv a strategy to oppose liquor while in opposition & promote liquor when in power? pic.twitter.com/YuSTCfBCko— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 28, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांच्या अध्यक्षतेखाली काल(२७ जाने) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- “दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?”, राम सातपुतेंचा हल्लाबोल
- “ईसापूर धरणाला ‘अद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय’ नाव द्या”, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “केंद्राकडे ६२५ करोड रुपये पडून”, बिहारमधील NTPC परीक्षा घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाडांचा खुलासा
- दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा रणंजी करंडक स्पर्धेचे नियोजन
- योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० तर चोऱ्यांमध्ये झाली ७२ टक्क्यांची घट- अमित शहा