भाजप पक्षातील अंतर्गत वाद थांबता थांबेना

नाशिक मधील तिन्ही आमदार एकापेक्षा एक नग

नाशिक : भाजपने पक्षांतर्गत वादाची सीमा पार केली. सोलापूर महापालिकेत तयार झालेले दोन गट ‘पालकमंत्री’ गट आणि ‘सहकारमंत्री’ गट त्यानंतर विदर्भातील अकोल्यातील पालकमंत्री आणि खासदार संजय धोत्रे प्रकरण. आता पुन्हा एकदा नाशिक शहरातील भाजप आमदारांच एकमेकांत जमत नसल्याच स्पष्ट झाल आहे. पक्षातील तिन्ही आमदार हे कधीच एकामतावर ठाम नसतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तिन्ही आमदारांना ‘भांडण्यापेक्षा कामे करा’ असे सुनावले.

नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार असून हे नेहमी एकमेकांविरोधात उभे असतात त्यामुळे पक्षाची सुद्धां बदनामी होत आहे. यामध्ये शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे हे तिन्ही आमदार एकापेक्षा एक नग आहेत. हिवाळी अधिवेशनापुर्वी नाशिक दौऱ्यावर असतांना दोन्ही महिला आमदारांनी शहराध्यक्षांविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सुद्धा या आमदारांनी एकमेकांना खोडायला सुरवात केली. त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा संतापले आणि तिन्ही आमदारांना ठणकावले.

You might also like
Comments
Loading...