सरकार ‘मोदीं’चेच; संसदेतील अविश्वास दर्शक ठराव भाजपने जिंकला

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभेमध्ये दिवसभर चाललेल्या वादळी भाषणांनंतर अखेर विरोधकांकडून मांडण्यात आलेला अविश्वास दर्शक ठराव भाजपने जिंकला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार केंद्रामध्ये कायम असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

केंद्र सरकारने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिल्याने टीडीपीकडून मोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. टीडीपीच्या प्रस्तावाला सर्व विरोधीपक्षांनी पाठींबा दिला होता. यावर आज लोकसभेत वाढली चर्चा करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारचे अक्षरश वाभाडे काढल्याच पहायला मिळाल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याकडून देखील विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.

 • तुम्हाला एवढी ताकद मिळावी की 2024 मध्ये तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा, मोदींचा विरोधकांना टोला
 • काँग्रेस सत्तेत असेपर्यंत बँकांना लुटण्याचं काम सुरु होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • केंद्राचं सरकार आंध्र प्रदेशातील जनतेच्या कायम पाठीशी असेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • आरक्षण संपेल, दलितांचं रक्षण करणारे कायदे संपतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • मी चौकीदारही आहे आणि भागीदारही आहे, पण तुमच्यासारखे सौदागर नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • हमारे शरद पवार ने आंख मे आंख डालने की कोशीष की, उनके साथ काँग्रेसने क्या किया? – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • मी गरीब, मागास जातीत जन्मलेला मुलगा आहे, तुमच्या नजरेला नजर भिडवून कसं बोलणार? – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • काँग्रेसने देशात अस्थिरता पसरवण्यासाठी अविश्वास प्रस्तावाचा वापर केलाय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • काँग्रेसला स्वत:वरच अविश्वास आहे आणि अविश्वासच त्यांची कार्यशैली आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • बेहिशेबी मालमत्तेचं विधेयक 20 वर्षे मंजूर केलं गेलं नाही, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होता? – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 90 हजार कोटी रुपये वाचवले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु असताना टीडीपीच्या खासदारांचा गोंधळ
 • 32 कोटी जनधन खाते उघडण्याचं काम आमच्या सरकारने केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • कुठल्याही राजकारणाविना आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रानुसार काम करतोय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • आम्हाला सव्वाशे कोटी देशावासियांचे आशीर्वाद आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • लोकशाहीत जनताच भाग्यविधाता, त्यामुळे लोकशाहीवर विश्वास असायला हवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • अविश्वास प्रस्तावामुळे आम्हाला बोलण्याची संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • एलईडी बल्ब कमी दरात दिले, 100 कोटी घरात बल्ब लागले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • ‘मोदी हटाव’च्या इच्छेने विरोधक पछाडलेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • अविश्वास प्रस्ताव लोकशाहीतील मोठं शस्त्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभेत दिवसभर काय घडल

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींना ‘जादू कि झप्पी’

मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत ;राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींनी केलेल्या मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेना खासदारानेही दिला दुजोरा   

भाषण करताना राहुल गांधी गडबडले; मोदीजी ‘बाहर जाते है’ ऐवजी ‘बार जाते है’चा उल्लेख 

चंद्रकांत खैरे यांना ‘मुख्य प्रतोद प्रमुख’ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश 

महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला निधी मिळतो, पण आंध्रप्रदेशच्या विकासाला नाही – टीडीपी