राज्यात आणि मावळातं भाजपचीचं सत्ता येणार – बाळा भेगडे

मावळ : राज्यात भाजपची सत्ता येणार असून मावळात ही भाजपचं येणार असल्याचा विश्वास भाजप उमेदवार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला आहे. आज कामशेत या भागाला बाळा भेगडे यांनी भेट दिली. यावेळी जनतेने बाळा भेगडे यांची रॅली काढत जोरदार स्वागत केले.

यावेळी भेगडे म्हणाले की, कामशेत शहरामध्ये मिळालेला प्रतिसाद म्हणजे मी आज या गावातून विजयाचा नारळच घेऊन जात असल्यासारखे वाटत आहे. कामशेत शहराच्या पुलाच्या मुद्द्याचे राजकारण करून जरी विरोधी पक्ष नागरिकांचे मन वळवू पाहत असले तरी आज राज्यात आणि मावळात भाजपचेचं सरकार येणार असल्याचा विश्वास भेगडे यांनी व्यक्त केला.

यावेळी कामशेतचे माजी सरपंच विजय शिंदे यांनी ही भाष्य केले. ते म्हणाले की, पुलाच्या कामामध्ये इतरही काही समस्या आहेत त्याचे सर्व दोष आमदारांना देऊन चालणार नाही. यामध्ये विरोध पक्ष उगाच राजकारण करू पाहत आहे, आमदार साहेबांनी आत्तापर्यंत जे काही केले आहे ते आमच्या गावच्या भल्यासाठीच केले आहे. कामशेत शहराच्या विकासासाठी 74 कोटी निधी दिला आहे त्यातील 80% काम झालेले आहे. तर आमदारांनी आत्तापर्यंत कामशेतसाठी खूप सारा निधी उपलब्ध करून दिला आहे. भूमिगत गटाराचे विषय मार्गी लागलेले आहे. बेरोजगार, घरकुल, विमा योजना यांसारख्या अनेक योजनांचा गावकऱ्यांचा फायदाच झालेला आहे, असे वक्तव्य कामशेत शहर भाजपा अध्यक्ष मोहन वाघमारे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...