मविआ सरकारला बदनाम करण्याच्या नादात भाजपने वाजपेयींचाच अपमान केला : सावंत

sachin sawant bjp

मुंबई : आसाममधल्या भाजप सरकारने मदरशाचे अनुदान बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. याच निर्णयाचे अनुकरण करून हिंदुत्ववादी सरकारने आपले खरे हिंदुत्व दाखवून द्यावे अशी मागणी भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर पुढे म्हणाले की, मदरश्यांमध्ये कोणतंही आधुनिक शिक्षण न देता एका विशिष्ट धर्माचेचं शिक्षण दिले जाते यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.तसेच मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी.या अर्थाने भातखळकर यांनी थेट सरकारला ओपन चँलेंज दिले आहे.

यावर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘११ जून २०१९ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदरशांच्या आधुनिकरणासाठी पावलं उचलून तेथील शिक्षकांना हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व संगणक विषयाचे प्रशिक्षण देऊन मदरशांतील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळेल याकरता योजना जाहीर केली होती. नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम युवकांकरता एका हातात कुराण व दुसऱ्या हातात संगणक हे व्हिजन सांगून ‘सब का विश्वास’ ही घोषणा दिली होती. मोदींजी ही घोषणा पूर्णपणे पोकळ आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. तरी आता भातखळकरांच्या वक्तव्यातून मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे अधोरेखीत होते.’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

तर, ‘मविआ सरकारला बदनाम करण्याच्या नादात वाजपेयी यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. महाराष्ट्रातील मदरसे बंद करा म्हणणाऱ्या अतुल भातखळकरांनी मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन मोदींचे ‘सब का विश्वास’ म्हणणे हे ढोंग आहे का? हा प्रश्न उपस्थित केला आहे. भातखळकरांच्या भुमिकेशी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सहमत आहेत का? असल्यास मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे अन्यथा भातखळकरांवर कारवाई करावी’ असं आव्हानच त्यांनी भाजपला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-