fbpx

भाजप अध्यक्षांची संपत्ती सात वर्षात ‘इतक्या’ पटीने वाढली

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या सात वर्षात तीनपट वाढली आहे. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून शहा यांनी नामांकन अर्ज दाखल केला असता त्यातून ही बाब उघड झाली आहे.

२०१७ मध्ये शहा यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्ज भरला होता. त्यावेळी त्यांनी त्यांची एकूण संपत्ती ३४.३१ कोटी रुपये दाखवली होती. २०१७ पासून ते आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत ४.५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारं मानधन, घरभाडे आणि शेती हीच मिळकतीची साधनं असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. तसेच त्यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल असून त्यापैकी दोन बिहारमध्ये आणि दोन पश्चिम बंगालमध्ये दाखल असल्याचेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान,काल अमित शाह यांनी आपला उमेदवारी अर्ज गांधीनगर मधून दाखल केला. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावलेली विशेष हजेरी चर्चेचा विषय बनली. यावेळी अमित शहा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.