fbpx

फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण भाजप कधीच करत नाही, भाजप खासदाराचा दावा

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमधील सत्ताकारणावरून सुरू असलेल्या संघर्षाबद्दल भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र नाशिकमध्ये बोलताना सोडले. आमदार फोडल्याचा काँग्रेसचा आरोप खोडून काढताना भाजपा कधीही घाणेरडे राजकारण करत नसल्याचे त्या म्हणाल्या. उलट काँग्रेस पक्षालाच त्यांचे लोक सांभाळता येत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच ज्या पक्षाला लोक सांभाळता येत नसतील त्यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे ही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जागा वाटपाचं समीकरण काय ठरलं ते माहिती नाही, मात्र पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं स्पष्ट, मत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीसाठी त्यांचा हा दौरा होता. विधानसभा निवडणुकीत भाजपचेच जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.