Share

Devendra Fadnavis | ‘विरोधक कधीही एकत्र आले तरीही…’; देवेंद्र फडणवीसांचा दावा

Devendra Fadnavis | पंढरपूर : सध्या राज्यात निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे सगळे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे  विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांकडून अनेक टीका, टिपण्णी करण्यात येतं आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप (BJP) पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

अशातच उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे राजकीय युती करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जेव्हा खरोखर एकत्र येतील, तेव्हा बघू, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. परंतु एरवी, एकमेकांच्या विरोधात भूमिका घेणारे, भिन्न विचारधारा असणारे, आदर्शमूल्ये वेगळी असणारे विरोधक केवळ आमच्या विरोधात म्हणून एकत्र येतात. मात्र अशा विरोधकांशी मुकाबला करायला भाजप नेहमीच समर्थ राहिला आहे आणि यापुढेही तेवढ्याच ताकदीने मुकाबला करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी फडणवीस काल (गुरूवारी) सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करताना महाराष्ट्र सुखी, सुजलाम् सुफलाम् व्हावा, महाराष्ट्राचा सर्वागीण विकास व्हावा, हेच मागणे विठ्ठलाच्या पायाशी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूरचा विकास आराखडा तयार होत असून स्थानिक भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीनुसार विकास आराखडा राबविण्यासाठी शासन कटिबध्द राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोणत्या पक्षाशी कोणता पक्ष युती करणार हे आताच्या घडीला सांगणं फार कठीण आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | पंढरपूर : सध्या राज्यात निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे सगळे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असल्याचं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now