येडियुरप्पा बरळले, देशाच्या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा भाजपलाचंं

टीम महाराष्ट्र देशा : देशात सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून भारत – पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. तर देशात दुसरीकडे या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल याची रणनीती आखली जात आहे. देशात सध्या असणाऱ्या युद्धजन्य परिस्थिती ही एक सत्ताधारी पक्षाची राजकीय खेळी आहे असा दावा काही मोदी विरोधी पक्षांंकडून केला जात आहे, तर दुसरीकडे भाजपचे कर्नाटकातले नेते सध्याचे असणारे हे वातावरण पुन्हा मोदी लाट निर्माण करण्यास पोषक असल्याने खुश आहेत. याच संदर्भातले वक्तव्य भाजपचे कर्नाटकातले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा केल आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने वारे वाहत असून, याचा फायदा कर्नाटकामध्ये लोकसभा निवडणुकीत होणार आहे. असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी येडियुरप्पा म्हणाले, की भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे दिवसेंदिवस देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप साठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर मोदींचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पक्षही मजबूत होत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून आपण कारवाई केल्यामुळे मोदींच्या समर्थनार्थ देशात चांगले वातावरण आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. आम्हाला विश्वास आहे, की आम्ही कर्नाटकमध्ये 22 जागांवर नक्कीच विजय मिळवू.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना , आमदारांना आणि खासदारांना सोशल मिडीया समोर बाष्कळ बडबड करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे तरी देखील काही अतिशाहणे बेलगाम वक्तव्य करत आहेत याचा फटका त्यांना आमदारकी, खासदारकीच्या तिकीट वाटपा वेळी मिळणार आहे. आता त्यात येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे.