भगवान श्री रामाचे नाव घेऊन भाजपने केली लोकांची फसवणूक- प्रवीण तोगडिया

मुरादाबाद: विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा टीका केली आहे. श्री रामाच्या नावाचा वापर करत लोकांची फसवणूक केल्याचा तोगडिया यांनी भाजपवर केला आहे. प्रवीण तोगडिया यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले तोगडिया ?

‘केंद्र आणि राज्यातील सरकारने राम मंदीर, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि बंद होणारा व्यापार, उद्योग-व्यवसायासाठी काहीही केले नाही. भगवान श्री रामाचे नाव घेऊन सरकार लोकांची फसवणूक करत आहे. सत्येत येण्यापूर्वी त्यांनी (मोदी सरकार) राम मंदीर बनवण्याचे आश्वासन दिले होते परंतु आता न्यायालयाचा आदेश येईपर्यंत कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट करत सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासली आहे. राम मंदिरासाठी बलिदान दिलेल्या कारसेवकांना सरकार विसरले आहे’

You might also like
Comments
Loading...