भाजपने आमचाचं जाहीरनामा चोरला – राहुल गांधी

मुंबई – आज कर्नाटक विधासभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून, आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केलीये.

‘आम्ही कर्नाटकात फिरलो. लोकांशी चर्चा केली आणि नंतरच आमचा निवडणूक जाहीरनामा तयार केला. भाजपनं मात्र आमच्या अनेक गोष्टी ढापत आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली,’ असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी भाजपवर शरसंधान साधलं. ‘या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपनं शिष्टाचार पाळला नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका करण्यावर अधिक भर दिला. आम्ही मात्र मुद्द्यांवर निवडणूक लढत होतो,’ असं राहुल यांनी सांगितलं. भाजपच्या दोन-चार नेत्यांनी केवळ अर्ध्या तासांत त्यांचा जाहीरनामा तयार केला. आमच्या जाहीरनाम्याचीच नक्कल केली. त्यामुळे कर्नाटकात आमचा विजय निश्चितच आहे, असंही ते म्हणाले.

Shivjal