कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही; महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

eknath khadse vs girish mahajan

भुसावळ : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला नुकसान सहन करावे लागणार अशा चर्चा सध्या चालू आहेत.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना लवकरच भाजपमधील आपले समर्थक राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला होता. शेकडो स्थानिक कार्यकर्ते वगळता अद्याप कोणत्याही भाजप आमदाराने भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. तर ‘कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही,’ असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे.

भुसावळ तालुक्यातील वरण गावच्या नगर पंचायतीच्या वतीने महाजन यांच्या काळात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज गिरीश महाजन यांचा नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, ‘भाजप हा विचार धारेवर चालणारा पक्ष आहे, तो कोणा एक व्यक्तीवर चालत नाही. कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही.’ असं म्हणतानाच त्यांनी खडसेंच्या नामोल्लेख करणं देखील टाळलं असलं तरी त्यांचा रोख हा खडसेंकडेच होता.

महत्वाच्या बातम्या