भाजपने मला माझ्या घरी थांबू दिले नाही, शरद पवारांचे भावनिक उदगार

टीम महाराष्ट्र देशा : तिसऱ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, महाराष्ट्रातील 14 जागासह देशभरातील 117 जागांसाठी मतदान केले जात आहे. दुपारी 4 पर्यंत महाराष्ट्र 45 टक्यांच्या आसपास मतदान झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात देखील आज मतदान होत आहे, यामध्ये आता भाजपने मला माझ्या घरी थांबू दिले नाही, असे भावनिक उदगार भाजपने मला माझ्या घरी थांबू दिले नाही, असं शरद पवार यांनी सांगितले आहे.

प्रचार संपल्यानंतर मी बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली. बारामतीत सभेनंतर माझा काही कार्यक्रम नव्हता. पण बारामतीमध्ये माझे घर शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू दिले गेले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

 

राज्यातील दुपारी 4 पर्यंतचे मतदान

4 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 45 टक्के मतदान

 • कोल्हापूर – 52.15 %
 • हातकणंगले – 50.99 %
 • सांगली – 46.61 %
 • सातारा – 44.64 %
 • माढा 44.18 %
 • पुणे – 34.81 %
 • बारामती – 45.33 %
 • अहमदनगर – 44.47 %
 • जळगाव – – 44 %
 • रावेर – 44.71%
 • जालना – 49.40 %
 • औरंगाबाद – 46.98 %
 • रायगड – 45 61%
 • रत्नागिरी – सिंधुदुर्ग – 39 %Loading…
Loading...