भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ जाहिरातबाजी करणारे; उद्धव ठाकरे

narendra modi with udhav thakary

जालना: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यापासून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही घेतल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. असे उद्धव ठाकरे यांनी जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी येथे शेतकरी मेळाव्यात स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा त्यांचावरील विश्वास उडाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही घेतल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच हल्लाबोल यात्रेच्या समारोपा दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका करत शिवसेनेच्या वाघाची शेळी आणि आता कासव झाले आहे, आधी शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेस सत्ता सोडण्यास सांगणारे तुम्ही कोण ? ही सत्ता जनतेने दिलेली आहे. अजित पवार बिन शेपटीचे आणि बिनशिंगाचे प्राणी असून त्यांना धरण आणि कालव्याच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.