मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळ्यात मोठा बॉम्ब फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी याआधी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं.
यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, भाजप सत्तेसाठी वाटेल ते करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, भाजपने बहुमत असताना शिवसेनेला पाठिंबा दिला व एकनाथ शिंदेला पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मोठेपणा दाखवला. भाजपकडे १२० संख्याबळ असताना मला मुख्यमंत्री केले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणून भाजपने पाठिंबा दिला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, काल शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर म्हणाले कि, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. योग्य वेळी त्यांच्याशी बोलू. सर्व गैरसमज दूर होतील. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आम्हाला सर्वांना एक सुखद धक्का बसल्याचेही सांगितले. शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार देखील मानले.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<