मराठा आरक्षणाला स्थगिती नंतर राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती…

Police Bharati

मुंबई : राज्यात आता सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. कााालल महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१९ साली जााहीर करण्यात आलेल्या ५२९७ पदांची भरती ४ मे २०२० रोजी रद्द करण्यात आली होती. तर, दुसऱ्या टप्प्यातील चालू वर्षात ६७२६ पदे भरायची आहेत. त्यामुळे या दोन्ही टप्प्यातील भरतीस शासन निर्णयातून सूट देत १२ हजार ५०० पदांची पोलीस भरती केली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांसमोर भविष्बायाबाबत अस्थिरता निर्माण झाली होती. आता राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाईल असा निर्णय घेतल्याने भविष्यबाबतचा काळोख दूर झाला असून पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना दिलासा मिळाला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतरच महाभरतीची लगबग का?

सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. त्यातच काल तब्बल १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठा आरक्षणासाठीच्या जागा या भरती प्रक्रियेअंतर्गत भरता येणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील अनेक युवकांना याचा फटका बसणार असून सामान्य पदांच्या जागांतूनच सामोरे जावे लागणार आहे. काहीच दिवसांपूर्वी न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असतानाच या पोलीस पदांच्या महाभरतीची आता लगबग का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या