‘हा’ मोठा पक्ष भाजपपासून दुरावतोय ? भाजपसमोर निर्माण झाला मोठा पेच

narendra modi sad

नवी दिल्ली: नितीश कुमार यांनी बिहारला २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आणखी एक पक्ष भाजपपासून दुरावत असल्याची चिन्ह दिसत आहेत. बिहारमध्ये सध्या जदयू आणि भाजपची सत्ता आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जदयू)चे अध्यक्ष नितीश कुमार भाजपला राम राम करतील ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नितीश कुमार यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीचेही समर्थन केले. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

तसेच मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन आणि राज्याला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीचा मुद्दा उचलून धरला आहे. निती आयोगाच्या शासकीय समितीच्या दोन दिवसीय बैठकीला रविवारपासून सुरुवात झाली. यामध्ये नायडू यांनी निती आयोगासमोर नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला.