महाविकास आघाडी सरकारच्या खावटी योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधीक लाभ

नांदेड । महाविकास आघाडी सरकारने आदिवासी कुटूंबांसाठी खावटी योजनेचे पुनरुज्जीवन केले आहे. या मध्ये महाराष्ट्रामधून नांदेड जिल्ह्यामधून सर्वाधीक लाभ मिळाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून विविध महत्वपुर्ण योजना तयार केल्या आहेत. तर त्या योजनांची अंमलबजावणीसाठी सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने आदिवासी कुटूंबियांसाठी खावटी योजना पुनरज्जीवीत करण्यात आली आहे. तर या मध्ये नांदेड जिल्ह्यामधून हजारो कुटूंबियांना लाभ होणार आहे. तर या योजनेसाठी आजपर्यंत १० हजार २८४ अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गंत पात्र कुटूंबियांना २ हजार रुपयांचे अनुदान तसेच धान्य तसेच वस्तुस्वरुपात देण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यामधून खावटी योजनेचा सर्वाधिक लाभ हा आदिवासी बहूल किनवट तालुक्याला मिळणार आहे. तर आजपर्यंत ५ हजार १२७ अर्ज या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. याच बरोबर माहूर १ हजार ७७२, हदगाव १ हजार ७६५, हिमायतनगर ८०७ आणि भोकर तालुक्यातील ६९२ अर्जदार या योजनेचे लाभार्थी ठरणार असल्याची माहिती या वेळी समाजमाध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या