मोठी बातमी : एक हजार मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती करण्याचा रिलायन्सचा संकल्प

ambani

मुंबई – देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी आता रिलायन्स उद्योग समूहानेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. देशातील विविध प्लाण्टमधून जवळपास एक हजार मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती करण्याचा संकल्प रिलायन्सकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, यामुळे देशभरातील अनेक शहरांत ऑक्सिजन तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. रिलायन्स उद्योग समूहाने कंपनीच्या जामनगर आणि इतरत्र इंधन शुद्धीकरण पेट्रोकेमिकल संकुले येथून दिवसाला 1000 मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरूपातील प्राणवायू तयार करण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या बाजूला कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी अदानी ग्रुपकडून देखील विशेष प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी कोरोना सेंटर उभारण्याबरोबरच देशातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 48 टँकरच्या माध्यमातून 780 मेट्रिक टन ऑक्सिजन आयात केला आहे.

सौदी अरेबियातून 80 मेट्रिक टन, आयर्लंडमधून 140 टन, सिंगापूर 160 टन, तैवान 180 टन आणि दुबईतून 220 मेट्रिक टन ऑक्सिजन आयात केल्याचे अदानी ग्रुपने स्पष्ट केले आहे. तसेच 17 उच्च क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती कारखाने आणि 120 ऑक्सिजन कॉन्सण्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत.

देशात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी केंद्र सरकार देखील अहोरात्र झटत आहे आता ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्याचा मोठा निर्णय मोदींनी घेतला आहे. या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी जवळपास १० हजार ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या