मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसला ३० तर राष्ट्रवादीला १० जागांवर विजय मिळाला आहे. भाजपचा विकासरथ मात्र जिल्ह्यात केवळ १५ जागांवर थांबला. इकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेलाही मतदारांनी नाकारले आहे. शिवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

अशात आता नागपूर जिल्हा परिषदेत आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाल आहे. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादीतर्फे रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नागपुरात जोरदार मुसंडी मारणाऱ्या आघाडीत आता बिघाडी झाली आहे.

Loading...

दरम्यान, राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारल्याचा मोठा फटका विदर्भात भाजपला बसला होता. त्याचे प्रत्यंतर नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातही दिसून आले. नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसला. बावनकुळे यांच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील दोन, मौदा तालुक्यातील दोन जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. बावनकुळे यांनी पालकमंत्री या नात्याने गेली पाच वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व केले होते. मात्र विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज होते. तेचं या निकालातून दिसून आले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण