fbpx

‘देशातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे आपल्या विभागाचं मोठं अपयश’

टीम महाराष्ट्र देशा- देशातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे आपल्या विभागाचं मोठं अपयश असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक मांडताना बोलत होते.

अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपला विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून, प्रशासकीय यंत्रणेतल्या कच्च्या दुव्यांमुळे, रस्ते अपघातांचं प्रमाण अद्यापही कमी झालं नसल्याचं, गडकरी म्हणाले. तमिळनाडूमध्ये रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याबद्दल गडकरी यांनी राज्यसरकारचं अभिनंदन केलं.