‘या’ तारखेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली :  बँक व्यवहार करण्यासाठी सध्याच्या काळात बँकांच्या अनेक सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात यामध्ये ऑनलाइन बँकिंग, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर, रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट, यांचा उल्लेख करता येतो. तर कोरोना काळात बँकांच्या या सुविधांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम ट्रान्झेक्शनवर आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

फायनान्शिअल ट्रान्झेक्शनवर इंटरचेंज फी १५ रुपयांवरून वाढवून १७ रुपये करण्यात आली आहे. तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झेक्शनवर फीमध्ये वाढ करून ५ रुपयांवरून सहा रुपये करण्यात आली आहे. हे नवे दर १ ऑगस्ट २०२१ पासून लागू होणार आहेत.

आरबीआयने सांगितले की, ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा निशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्झेक्शन येते. तसेच ग्राहक अन्य बँकेच्या एटीएमद्वारे देखील विनाशुल्क पैसे काढू शकतात. रिझर्व बँकेनुसार इंटरचेंज शुल्क हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट प्रोसेस करण्यासाठी बँका मर्चंटकडून आकारतात.

दरम्यान एटीएम ट्रान्झेक्शन जर या निशुल्क पेक्षा जास्त वेळा झाले तर त्याच्या शुल्कामध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे.  ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. सध्या हे शुल्क 20 रुपये आहे. ते 21 रुपये होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक फी द्यावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP