सरकारचा मोठा निर्णय, शहीद जवानांच्या परिवाराला सरकारकडून 5 एकर जमीन

टीम महारष्ट्र देशा : शहीद जवानांच्या परिवाराच्या मदतीसाठी राज्य शासनाने ५ एक्कर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला असून याचा प्रथम मान नांदेड जिल्ह्यातल्या शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना मिळाला आहे. काश्मीर येथे सीमेवर तैनात असताना संभाजी कदम शहीद झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

घरातला कमावता मुलगा गेल्याने कुटुंब कस काय उदरनिर्वाह करणार असा प्रश्न होता. राज्य सरकारने 28 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील शहीदांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी करून शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन खरबी या गावात मोफत दिली आहे.

सरकारच्या या योजनेमुळे आपल्याला 5 एकर जमीन मिळाल्याने आता परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही या जमिनीवर शेती करू असे वीरपत्नी शीतल संभाजी कदम यांनी सांगितले. तर आपल्या गावातील शासकीय जमीन एका वीरपत्नीला मिळाल्याचा आम्हाला अभिमान असल्याचं गावकरी सांगत आहेत.