fbpx

मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा !

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, उडीसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीर विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा दलाची उपलब्धता आणि इतर बाबींचा विचार करून निवडणूक आयोग निवडणुका किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात होतील याबाबत निर्णय देणार आहे. यावेळीही आंध्र प्रदेश, उडीसा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांसोबत घेण्याची शक्यता असल्याने निवडणुकासांठी वेगळी सुरक्षा व्यवस्था आणि इतर तयारी करण्याची गरज नसते. त्यामुळे खर्च आणि आयोगावरील ताणही कमी होतो.

गेल्या काही दिवसांपासून सरकार देशातील सर्वच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेईल अशा चर्चा चालू होत्या मात्र कर्नाटक तसेच नुकत्याच झालेल्या पाच राजांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यामुळे आता त्या चर्चांना पूर्ण विराम लागला असला तरी निवडणूक आयोग काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडनुकांसोबत घेण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने तारखांच्या घोषणा जाहीर केल्यानंतर निवडणुकीचा फड रंगात येईल.त्यानंतर आचारसहिंता लागू होईल,तसेच कामांचा आणि लोकप्रिय घोषणांचा अधिकृतरित्या धडाका लावणाऱ्या मोदी सरकारला कुठलाही निर्णय घेता येणार नाही.