‘भीमा कोरेगाव’ प्रकरणाचे राज्यसभेत तीव्र पडसाद

संग्रहित फोटो

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव येथील हिंसाचारावरून राजकारण चांगलेच तापले असून विरोधी पक्षांनी सत्त्ताधारी भाजप ला लक्ष केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी यांनी एकत्रित येवून भाजप विरोधात हल्लाबोल चढविला.

दरवेळी दलितांवरील अत्याचारांसाठी काँग्रेस नेहमीच संघाला जबाबदार धरतं ही गोष्ट चुकीची असुन एल्गार परिषेदेत जी भाषणं झाली ती प्रक्षोभक होती, ज्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडलं जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी भाषणातून जनतेला भडकावले. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित झाले. दलितांवर जो अन्याय झाला, ही दु:खद घटना आहे. :खासदार अमर साबळे

भीमा कोरेगाव यथे झालेल्या हिंसेमागे जे कोणी त्यांच्यावर  कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देले आहे. ३१ तारखेला मी सुद्धा तिथे गेलो होतो. या मुद्यावर राजकारण होऊ नये. दरवर्षी ४५ हजार दलितांवर अत्याचार होतो. कोणतेही सरकार अत्याचार करा म्हणून सांगते का? समाजात स्थिरता निर्माण करायची असेल तर क्रांतीचा मार्ग उपयोगाचा नाही यावर शांततेने मार्ग काढणे गरजेचे आहे. तसेच समाजात परिवर्तन आणायचे असेल तर आंतरजातीय विवाह हाच चांगला मार्ग आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी ब्राम्हण समाजाची होती. माझी पत्नीही ब्राम्हण आहे. यामुळे समाजात एकोपा येतो. :रामदास आठवले

भीमा-कोरेगावमध्ये काही अदृश्य हातांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबण्याचा प्रयत्न केला.
पेशव्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदू एकता मंचशी नव्हता’ भीमा कोरेगाव हिंसाचार दु:खद घटना आहे. महाराष्ट्र सरकारने संयम राखत बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणली. सरकारने त्या वेळी जे केले ते ठिकच होते. : शिवसेना खासदार संजय राऊत

भीमा कोरेगाव येथे दरवर्षी अनुयायी येतात. याच वर्षी हिंसाचार का झाला. लोकांमध्ये अशांतता का पसरली. भीमा कोरेगाव येथे दलित व्यक्तीच्या समाधीवर दगडफेक करण्यात आली. नंतर त्याला उत्तर म्हणून दुसऱ्या समाजातील लोकांनीही हल्ला केल्याने दोन गटांत वाद निर्माण झाला. भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. : शरद पवार

आम्ही या घटनेची निंदा करतो. दलित समाजाला महाराष्ट्रात पुढे जाऊ न देण्यासाठी काही लोकांचे षड्यंत्र आहे. : सीपीआय नेते डी राजा

शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत जो प्रकार घडला आहे तो निंदनीय आहे. समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी. : खासदार छत्रपती संभाजीराजे

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...