रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये करार ग्राहकांना मिळणार हा फायदा

रिलायन्स जिओ आणि एअरटेल

मुंबई : रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम क्षेत्रातील दोन मोठ्या प्रतिस्पर्धी कंपन्या मानले जातात. मात्र नुकतच या कंपन्यांनी जवळपास १५०० कोटी रूपयांचा करार केला आहे. यामुळे मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्ली या सर्कल्समधील ग्राहकांना उत्तम नेटवर्क अनुभवता येणार आहे

या करारानुसार एअरटेल आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईतील आपले ८०० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमचे अधिकार रिलायन्स जिओला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर यामुळे रिलायन्स जिओला उत्तम सेवा देण्यास मदत मिळणार आहे आणि नेटवर्क क्षमताही वाढणार आहे. अशी माहिती भारती एअरटेलनं दिली आहे.

त्यामुळे आता गेल्या काही महिन्यांपासून ५ जी सेवा सुरू करण्या वरून प्रचंड स्पर्धा निर्माण झालेल्या दोन कंपन्या करारबद्ध झाल्यानंतर या कराराद्वारे एअरटेलला रिलायन्स जिओ १०३७.६ कोटी रूपये देईल. सध्या या कराराला नियामक मंडळाची मंजुरी मिळणं शिल्लक आहे.

महत्वाच्या बातम्या