आयपीएल रद्द झाल्यानंतर बीसीसीआयच्या निर्णयाचे ‘या’ संघाकडुन स्वागत

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. स्पर्धेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा ही अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.

स्पर्धा रद्द झाल्यानंतर बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने ट्विट करुन बीसीसीआयच्या या निर्णायाचे स्वागत केले आहे. आरसीबीने ट्विट करत म्हणले आहे की,’आयपीएलशी संबधीत खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि स्पर्धेशी निगडीत कर्मचारी या सर्वांचा जीव जास्त महत्वाचा आहे. याबाबतीत बीसीसीआय कोणत्याही प्रकारची तडजोड करु इच्छित नाही’ असे ट्विट आरसीबीने केले आहे.

आयपीएल स्पर्धेत आरसीबीने ना भुतो ना भविष्य अशी कामगीरी केली होती. सलामीचे सलग चार सामने जिंकत आरसीबीने या स्पर्धेत वर्चस्व गाजवले होते. स्पर्धा स्थगित झाली तेव्हा आरसीबी संघ हा गुणतालीकेत तिसऱ्या स्थानी होता. स्पर्धेत आरसीबी संघाने ७ सामन्यात ५ सामन्यात विजय मिळवला तर २ सामन्यात पराभव स्विकारला होता. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या