अन् रिषभ पंतच्या हातून सुटली बॅट….; व्हिडीओ व्हायरल

आहमदाबाद : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने पंजाब किंग्सचा ७ गडी राखुन पराभव केला आहे. पंजाबने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य ३ गडी गमावत अवघ्या १८व्या षटकात पार केले. ९९ धावांची खेळी करणारा पंजाबचा कर्णधार मंयक अग्रवाल हा सामनावीराचा मानकरी ठरला.

सामन्या दरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतसोबत मजेशीर प्रसंग घडला. १७व्या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजीसाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रिषभ पंतने ऑउटसाइड ऑफला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतच्या हातून बॅट सुटल्यामुळे चेंडू जास्त दूर जाऊ शकला नाही आणि पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालने सहज त्याचा झेल पकडला. अशाप्रकारे पंत दुर्दैवाने स्वतच्याच हातून बाद झाला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

यानंतर दिल्लीच्या चाहत्यांनी ‘रोहितच रोहितची विकेट घेऊ शकतो’, या वाक्यात रोहितचे नाव बदलक ‘पंतच पंतची विकेट घेऊ शकतो’, असे म्हटले आहे. सामन्यात पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत १४ धावा केल्या होत्या. स्पर्धेतील पंजाबविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली ने पुन्हा वर्चस्व गाजवत सामना खिशात घातला. या विजयासह दिल्लीचा संघ हा पुन्हा गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला.

महत्वाच्या बातम्या