तहसीलदाराचा मुळशी पॅटर्न, तब्बल 1 कोटींची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुणे: पुण्यातील मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना तब्बल 1 कोटींची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच कोट्यवधींची लाच घेताना वकिलाला पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच दुसरी मोठी कारवाई करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.तक्रारदाराचे वारस नोंदणीचे प्रकरण फेरतपासणीसाठी डोंगरे यांच्याकडे आले होते. तक्रारदाराच्या बाजूने निकालपत्र देणं आणि 7/12 पत्रक नोंदीसाठी तहसीलदार डोंगरे यांनी 1 कोटींची मागणी केली होती.

Loading...

दरम्यान, तक्रारदाराने याबाबतच एसीबीकडे तक्रार केली होती. ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री उरवडे गावाजवळ असणाऱ्या घोटवडे फाटयावर तक्रारदाराकडून 1 कोटींची लाच घेताना एसीबीने डोंगरेंना रंगेहाथ पकडलं आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही एसीबीची या वर्षातील दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.Loading…


Loading…

Loading...