‘या’ बँकेच्या 900 शाखा होणार बंद

नवी दिल्ली :
बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तिन्ही बँकांचं विलीनीकरण झाल्यामुळे बँक ऑफ बडोदानं ९०० शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच ठिकाणी देना बँक आणि विजया बँकेच्या शाखा असताना तिथे बँक ऑफ बडोदाची शाखा असणं गरजेचं नसल्याने बँक ऑफ बडोदा आपल्या शाखा बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे .

१ एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तिन्ही बँकांचं विलीनीकरण झाले. त्यामुळे एकाच ठिकाणी देना बँक आणि विजया बँकेच्या शाखा असताना तिथे बँक ऑफ बडोदाची शाखा असणं गरजेचं नाही. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी एकाच इमारतीत तिन्ही बँकांच्या शाखा असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे या शाखा एक तर बंद होतील किंवा त्यांचं विलीनीकरण करण्यात येईल. असे समोर आले आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदानं ९०० शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

Loading...

विशेष म्हणजे, एसबीआय आणि पीएनबीनंतर बँक ऑफ बडोदा आता देशातली तिसरी सर्वात मोठी बँक म्हणून समोर आली आहे. याची एकूण बाजारातील उलाढाल १५ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. बँक ऑफ बडोदाजवळ सध्या ग्राहकांची संख्या १२ कोटी इतकी आहे. या बँकांच्या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदाच्या ९५०० शाखा आणि ८५ हजार कर्मचारी झाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

तू फक्त येच तुला कापुनच टाकतो, तृप्ती देसाईंना धमकीचा फोन