मोहर्रम मिरवणुकीदरम्यान दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी

Muharram and durga puja

कोलकाता : मोहर्रम मिरवणुकीदरम्यान यंदाही दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केली. दुर्गा पूजा आयोजकांबरोबर झालेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या.

विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते. कारण त्यानंतर मोहर्रम मिरवणुका निघतील. जर या दोन्ही मिवरणुका एकमेकांसमोर आल्या, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. काही लोक अशा गोष्टींचा फायदा घेऊ शकतात आणि हिंदू व मुसलमान यांच्यात वाद निर्माण करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकतात, असेही मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या.

Loading...

मुहर्रमच्या दिवशी २४ तास वगळता २, ३ व ४ ऑक्टोबर रोजी मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते, असेही बैठकीनंतर बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या. गेल्या वर्षी अशा प्रकारे राज्य सरकारने मूर्ती विसर्जनावर बंदी घातली होती. यामुळे ११ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त मूर्ती विसर्जन व १३ ऑक्टोबर रोजी मुहर्रम साजरा करण्यात आला. यावर हा मनमानी निर्णय असल्याचे सांगत कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते.

समाजातील अल्पसंख्यांक वर्गाला खुश करण्याचा हा राज्य सरकारचा सुस्पष्ट प्रयत्न असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले. समाजातील दोन वर्गांमध्ये तेढ निर्माण करणारा कोणताही निर्णय केला जाऊ शकत नाही, असा आदेश न्या. दीपंकर दत्ता यांनी ६ ऑक्टोबर २०१६ रोजी दिला होता.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान